लक्ष्मी ध्यानम्
🌹 लक्ष्मी ध्यानम् 🌹
सहस्त्रदलपद्मस्य कर्णिकावासिनीं पराम् ।
शरत्पार्वणकोटीन्दुप्रभाजुष्टवराम्बराम् ॥ १ ॥
स्वतेजसा प्रज्वलन्तीं सुखदृश्यां मनोहराम् ।
प्रतप्तकाञ्चननिभां शोभां मूर्तिमतीं सतीम् ॥ २ ॥
रत्नभूषणभूषाढ्यां शोभितां पीतवाससा ।
ईषद्धास्यप्रसन्नास्यां शश्र्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ ३ ॥
सर्वसम्पत्प्रदात्रीं च महालक्ष्मीं भजे शुभाम् ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे प्रकृतिखण्डे लक्ष्म्या ध्यानम् सम्पूर्णम् ॥
लक्ष्मी ध्यानम् चा मराठी अर्थ
परम पूज्य भगवती महालक्ष्मी सहस्र पाकळ्या असलेल्या कमल कर्णिकांवर विराजमान आहे.
तीची सुंदर साडी शरद् ऋतूंतील पौर्णिमेच्या करोडो चंद्रांच्या प्रकाशाने शोभायमान झाली आहे.
ही परम साध्वी देवी स्वतःच्या तेजाने प्रकाशित होत आहे.
या परम मनोहर देवीच्या दर्शनाने मन आनंदाने प्रफुल्लीत होत आहे.
हीची अंगकांती तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसत आहे.
मढविलेल्या रत्नांनी हीचे सौन्दर्यांत भर पडली आहे.
तीने पीतांबर नेसले आहे.
या प्रसन्न चेहर्याच्या भगवती महालक्ष्मीच्या चेहर्यावर हास्य उमलेले आहे.
ही नेहमी युवावस्थेंत संपन्न दिसते.
ही सर्व प्रकारची संपत्ती देते.
अशा कल्याणस्वरूप असलेल्या भगवती महालक्ष्मीची मी उपासना करतो
Comments
Post a Comment