Posts

अठ्ठावीस युगे

🌹 अठ्ठावीस युगे 🌹 `युगे अठ्ठावीस विटेवरी उभा'... यातील `युगे अठ्ठावीस' म्हणजे नेमके काय ? सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.   ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’ *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

पंच महाभूतें

🌹 पंच महाभूतें 🌹 १ पृथ्वी  २ आप  ३ तेज  ४ वायु आणि  ५ आकाश  हीं पंच महाभूतें परमात्म्यानें विश्वोत्पत्तीकरितां निर्माण केलीं . ( क . गी . २ - १३ ) यांना भूतपंचक म्हणतात . *पंचमहाभूतांचे स्वभाव , धर्म , गुण , आकार आणि रंग* १ पृथ्वी - कठोरता - गंध - भ्रमण - स्थूल - पीत २ आप - शीतलत्व - रस - अधोगमन क्रिया - स्थूल - श्वेत . ३ तेज - उष्ण अथवा प्रकाश - रूप - ऊर्ध्वगमन क्रिया - स्थूल - लाल - सूक्ष्माकार . ४ वायु - कोमलत्व - स्पर्श अथवा शब्द - तिर्यग्गमन क्रिया - सूक्ष्माकार - हिरवा . ५ आकाश - शून्यधर्म - निर्गुण - अक्रिय - गोलाकार - रंगरहित . ( पंचग्रंथी ) *पंच महाभूतांचीं पांच प्रतीकें*  १ पृथ्वी - आयत  २ आप - वर्तुळ  ३ तेज - त्रिकोन  ४ वायु - चंद्रकोर व  ५ आकाश - ज्योत

१०० कौरव बंधूंची नावे

 १०० कौरव बंधूंची नावे  महाभारत आदिपर्वाच्या १०८व्या अध्यायात श्लोक २-१४ येथे दिली आहेत ती अशी आहेत. (प्रत्येक श्लोकाअखेर त्यातील नावे सुटी करून मराठीमध्ये दिली आहेत आणि त्या नावांची गणती दाखविली आहे.) दुर्योधनो युयुत्सुश्च राजन्दुःशासनस्तथा । दुःसहो दुःशलश्चैव जलसन्धः समः सहः ॥ २॥ दुर्योधन, युयुत्सु, दु:शासन, दु:सह, दु:शल, जलसन्ध, सम, सह (१-८) विन्दानुविन्दौ दुर्धर्षः सुबाहुर्दुष्प्रधर्षणः । दुर्मर्षणो दुर्मुखश्च दुष्कर्णः कर्ण एव च ॥ ३॥ विन्द, अनुविन्द, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रधर्षण, दुर्मर्षण, दुर्मुख, दुष्कर्ण, कर्ण (९-१७) विविंशतिर्विकर्णश्च जलसन्धः सुलोचनः । चित्रोपचित्रौ चित्राक्षश्चारुचित्रः शरासनः ॥ ४॥ विविंशति, विकर्ण, जलसन्ध, सुलोचन. चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, शरासन (१८-२६) दुर्मदो दुष्प्रगाहश्च विवित्सुर्विकटानन: । ऊर्णनाभः सुनाभश्च तथा नन्दोपनन्दकौ ॥ ५॥ दुर्मद, दुष्प्रगाह, विवित्सु, विकटानन, ऊर्णनाभ, सुनाभ, नन्द, उपनन्दक (२७-३४) सेनापतिः सुषेणश्च कुण्डोदरमहोदरौ । चित्रबाणश्चित्रवर्मा सुवर्मा दुर्विमोचनः ॥ ६॥ सेनापति, सुषेण, कुण्डोदर, महोदर, चित्रबाण, च...

द्वादशज्योतिर्लिङ्गानि - बारा ज्योतीर्लिंगे

  द्वादशज्योतिर्लिङ्गानि - बारा ज्योतीर्लिंगे सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात: पठेन्नर:। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥ बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने १.सोमनाथ - सौराष्ट्र -  गुजरात २.मल्लिकार्जुन - श्रीशैल्य -  आंध्रप्रदेश ३.महाकाल - उज्जैन - मध्यप्रदेश ४.ममलेश्वर - ओंकारेश्वर -  मध्यप्रदेश ५.वैद्यनाथ - परळी - महाराष्ट्र ६.भीमाशंकर - डाकिनी(पुण्याजवळ) महाराष्ट्र ७.रामेश्वर - सेतुबंध - तामिलनाडु ८.नागेश्वर - दारुकावन (औंढ्या नागनाथ) महाराष्ट्र ९.विश्वेश्वर - वाराणसी - उत्तर प्रदेश १०.त्र्यंबकेश्वर - नाशिक जवळ . महाराष्ट्र ११.केदारनाथ - हिमालय - उत्तरांचल १२.घृष्णेश्वर - वेरूळ -महाराष्ट्र

लक्ष्मी ध्यानम्

🌹 लक्ष्मी ध्यानम् 🌹 सहस्त्रदलपद्मस्य कर्णिकावासिनीं पराम् । शरत्पार्वणकोटीन्दुप्रभाजुष्टवराम्बराम् ॥ १ ॥ स्वतेजसा प्रज्वलन्तीं सुखदृश्यां मनोहराम् । प्रतप्तकाञ्चननिभां शोभां मूर्तिमतीं सतीम् ॥ २ ॥ रत्नभूषणभूषाढ्यां शोभितां पीतवाससा । ईषद्धास्यप्रसन्नास्यां शश्र्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ ३ ॥ सर्वसम्पत्प्रदात्रीं च महालक्ष्मीं भजे शुभाम् ॥ ॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे प्रकृतिखण्डे लक्ष्म्या ध्यानम् सम्पूर्णम् ॥ लक्ष्मी ध्यानम् चा मराठी अर्थ परम पूज्य भगवती महालक्ष्मी सहस्र पाकळ्या असलेल्या कमल कर्णिकांवर विराजमान आहे.  तीची सुंदर साडी शरद् ऋतूंतील पौर्णिमेच्या करोडो चंद्रांच्या प्रकाशाने शोभायमान झाली आहे.  ही परम साध्वी देवी स्वतःच्या तेजाने प्रकाशित होत आहे.  या परम मनोहर देवीच्या दर्शनाने मन आनंदाने प्रफुल्लीत होत आहे.  हीची अंगकांती तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसत आहे.  मढविलेल्या रत्नांनी हीचे सौन्दर्यांत भर पडली आहे.  तीने पीतांबर नेसले आहे.  या प्रसन्न चेहर्‍याच्या भगवती महालक्ष्मीच्या चेहर्‍यावर हास्य उमलेले आहे.  ही नेहमी युवावस्थेंत संपन्न दिसते...

गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा

  गायत्री  मंत्र  सर्वाक्षर  महिमा '' ॐ ''  या  अक्षराचा  उच्चार  केला  असता  मस्तकातील  भाग  प्रभावित  होतो.   '' भू: ''  या  अक्षराच्या  उच्चाराने  उजव्या  डोळयावरील  चार बोटांचा  कपाळाचा  भाग  जागृत   होतो. '' भूव: ''  च्या  उच्चारणाने  मानवाच्या  भृकुटीच्या  वरील  तीन  अंगुलीचा  भाग  प्रभावित  होतो. '' स्व: ''  या  अक्षराच्या  उच्चाराने  डाव्या  डोळयावरील  कपाळाचा  चार  अंगुली  इतका  भाग  जागृत   होतो. '' तत् ''  च्या  उच्चाराने  आज्ञा  चक्रामध्ये  असलेली  'तापिनी'  ग्रंथीतील  सूप्त  असलेली  'साफल्य'  शक्ति   जागृत   होते. '' स ''  च्या  उच्चाराने  डाव्या  डोळयातील  सफलता  नांवाच्या  ग्रंथीमध्ये  सुप्त  रूपाने  असलेली  ...

भक्तीचे महात्म्य

  ब्रह्मदेवांनी व्यास मुनींना सांगितलेले भक्तीचे महात्म्य      सर्वज्ञ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा तो गणेश केवळ भक्तीमुळे संतुष्ट होतो. भाव हेच गणेशाच्या संतोषाचे कारण आहे. भक्तीने समर्पित केलेल्या पानांफुलांमुळे संतुष्ट झालेला गणेश हा त्या भक्ताला स्वत:च समर्पित होतो. पण दंभाने, अहंकाराने, दुस-याने केले म्हणून समर्पित केलेल्या मोठ्या संपत्तीने, दानाने तो कधीच संतुष्ट होत नाही. सहज प्राप्त झालेल्या आणि प्रसंगपरत्वे मनात दृढ भाव धरुन समर्पित केलेल्या शमीच्या एका पानाने प्रसन्न होऊन गणेशाने व्याधास सलोकतामुक्ती दिली आणि म्हणूनच सर्वात भक्ती हेच श्रेष्ठ साधन आहे. शमीच्या एका पानाने व्याधाचा उद्धार कसा झाला ते पाहू :      पूर्वी विदर्भ देशात आदिषा या नावाचे एक प्रख्यात नगर होते. त्या नगरात भीम नावाचा एक व्याध म्हणजे पारधी राहत होता. तो बाणांनी भरलेला भाता, हाती धनुष्यबाण आणि तलवार घेऊन शिकारीसाठी जात असे आणि जंगलातील प्राण्यांना मारुन त्यांचे मांस विकत असे. निर्जन वनात तो दृष्ट ब्राह्मणांचीही हत्या करीत असे.      एकदा त्या नगरात मोठा उत्सव स...